Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tushar Apte Resignation: चोवीस तासांत खेळ खल्लास! बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा अखेर राजीनामा

Tushar Apte Resignation: चोवीस तासांत खेळ खल्लास! बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा अखेर राजीनामा

Tushar Apte Resignation: बदलापूर येथील चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांनी अखेर आपल्या ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या २४ तासांत जनसामान्यांचा वाढता संताप आणि विरोधकांनी घेरल्यामुळे भाजपला हे पाऊल उचलणे भाग पडले आहे. आपटे यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे सोपवला आहे.

नियुक्तीनंतर अवघ्या एका दिवसात माघार

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या कार्यकारी बैठकीत कालच तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, एका ‘पॉक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला अशा प्रकारे राजकीय सन्मान दिल्याने संपूर्ण राज्यातून भाजपवर टीकेची झोड उठली. ही निवड रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) १३ किंवा १४ जानेवारीला बदलापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या इशाऱ्यामुळे आणि वाढत्या दबावामुळे भाजपने अखेर डॅमेज कंट्रोल करत आपटेंचा राजीनामा घेतला.

हेही वाचा –बदलापूर एन्काऊंटरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी पाच पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

राजकीय नाचक्की आणि विरोधकांचा प्रहार

दरम्यान, ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी ‘लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला भाजपने बक्षीस दिले आहे का?’ असा धारदार सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या नियुक्तीमुळे भाजपची मोठी नाचक्की झाली. पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात आल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दोषींवर निष्पक्ष कारवाई होईल, असे संकेत दिले होते.

काय म्हटले आहे राजीनामा पत्रात?

तुषार आपटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ‘मी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाचा आज 10 जानेवारी 2026 रोजी स्वखुशीने राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा.’ सध्या आपटे जामिनावर बाहेर असले तरी, त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य पाहता ही नियुक्ती भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!