Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून; पुण्यात चुलत भावानेच दिली 4 लाखांची सुपारी; आरोपी अटकेत

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून; पुण्यात चुलत भावानेच दिली 4 लाखांची सुपारी; आरोपी अटकेत

पुणे: पुण्यातील कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात एका तरुणाच्या खुनाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या चुलत भावाचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका आरोपीने खुनासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?

17 नोव्हेंबरला कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय 22) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रथम अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत याला अटक केली.

खून सुपारी देऊन केल्याचा खुलासा

प्राथमिक चौकशीत अशोकला अजयचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने हा खून केल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता, हे प्रकरण ‘सुपारी देऊन’ खून केल्याचे असल्याचे उघड झाले.

अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी त्याचा साथीदार कृष्णकुमार विजयमहतो वर्मा, सचिनकुमार शंकर पासवान आणि या गुन्ह्यातील पहिला साक्षीदार असलेल्या रणजितकुमार धनुखी यादव यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले.

साक्षीदारच निघाला आरोपी

खुनाच्या गुन्ह्यात हा साक्षीदार स्वतः सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांना मोठा धक्का बसला. यामुळे पोलिसांनी तातडीने चौघांचा शोध सुरू केला. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हे चारही आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने त्यांच्या मूळ गावी झारखंडला पसार होणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने सापळा रचून या चौघांनाही अटक केली. भारती विद्यापीठ पोलिस या गुंतागुंतीच्या खुनाच्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!