पुणे : शहरात उन्हाचा चटका कायम असला, तरी अंशतः ढगाळ हवामान असल्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. रविवारी (दि.१६) कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश काही काळ ढगाळ राहणार आहे.
गेले काही दिवस शहरात झपाट्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. उपनगरातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. मात्र, गेले दोन दिवस अंशतः ढगाळ हवामान असल्यामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मात्र, किमान तापमानात वाढ होत आहे. रविवारी किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस होते. उपनगरातही तापमानात चढउतार सुरू आहे. कोरेगाव पार्क येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमान होते. येत्या १७ ते २२ मार्चदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे


