Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

…. तर १ एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

…. तर १ एप्रिलपासून दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: राज्य सरकारने फास्ट टॅग संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्ट टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुमच्या कारला फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला, तर तुम्हाला टोलचे पैसे दुप्पट भरावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. फास्ट टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली आहे. त्यानंतर आता १ एप्रिलपासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टंग अनिवार्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. फास्ट टंग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार आहे. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील पाच टोलनाके एमएसआरडीसीकडे आहेत. यात मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली, दहिसर आणि वाशी या पाच टोल नाक्यांवर स्कूल बसेस, हलकी मोटार वाहने आणि राज्य परिवहन बस यांना कोणताही टोल आकारला जात नाही. तर, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजी नगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, काटोल बायपास आणि चिमूर वरोर-वणी महामार्गचं व्यवस्थापनही एमएसआरडीसीकडे आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवार्शाना फास्ट टॅग बंधनकारक असेल. अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागतील.

मुंबईत हलक्या वाहनांना, शाळेच्या बसला टोलमाफी आहे. त्यानुसार मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोल नाक्यांवर या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असून तेथे फास्ट टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, एमएमआरमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांना फास्ट टॅग नसण्याची शक्यता आहे. पण यापुढे त्यांनाही फास्ट टॅग प्रणालीशी खाते जोडावे लागेल. कारण वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि अटल सेतूवर टोल वसुली करण्यात येते. तेथे कोणत्याही वाहनांना टोल माफी नाही. त्यामुळे तेथे प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फास्टंग अनिवार्य आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!