Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Congress Pune Manifesto | ‘पुणे फर्स्ट’चा निर्धार; अधिकारनाम्यातून काँग्रेसचे खड्डेमुक्त रस्ते ते मोफत पीएमपी प्रवासाचे आश्वासन

Congress Pune Manifesto | ‘पुणे फर्स्ट’चा निर्धार; अधिकारनाम्यातून काँग्रेसचे खड्डेमुक्त रस्ते ते मोफत पीएमपी प्रवासाचे आश्वासन

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी पुणेकरांसाठी ‘पुणे फर्स्ट’चा नारा देत आपला अधिकारनामा प्रसिद्ध केला. खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीतून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, प्रदूषणमुक्त शहर आणि पुण्याला पर्यटनाची राजधानी बनवण्याचे आश्वासन या अधिकारनाम्यात देण्यात आले आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व पुणे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ‘पुणे फर्स्ट’ या नावाने अधिकारनामा जाहीर करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अजित दरेकर आणि युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले की, सध्याचे सत्ताधारी पाणी प्रश्नावर बोलत नाहीत. पुणेकरांना पाण्यासाठी एनजीटीमध्ये जावे लागले, हे दुर्दैवी आहे. भाजपने केवळ घोषणा केल्या, मात्र अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले. ‘पुणे फर्स्ट’ हेच आमचे ध्येय असून पुणेकरांनी पाच वर्षांची संधी दिल्यास दिलेला शब्द पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस-शिवसेना (उबाठा) जागावाटप

महापालिका निवडणूक आघाडीने लढवली जाणार असून काँग्रेस ९८ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ७६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आठ ते नऊ जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार असून त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अरविंद शिंदे यांनी दिली.

काँग्रेसने सत्तेत असताना केलेली कामे

जेएनएनयूआरएमअंतर्गत पायाभूत सुविधा, मेट्रोची पायाभरणी, बीआरटीसाठी हजार कोटींपेक्षा जास्त निधी, पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना, १०० हून अधिक उद्याने, झोपडपट्ट्यांमध्ये सुलभ शौचालये आणि आयटी कंपन्यांना करसवलत.

सत्तेत आल्यास काँग्रेसची प्रमुख आश्वासने

समान पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीमुक्त पुणे, महिलांसाठी पीएमपी मोफत प्रवास, ६७८ मिसिंग लिंक रस्ते पूर्ण करणे, ५ हजार ईव्ही बसची भर, वॉर्डस्तरीय कचरा व्यवस्थापन, गुन्हेगारीवर कठोर कारवाई, मालमत्ता करावरील व्याज १ टक्का आणि ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे करमुक्त करणे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!