Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Winter Alert | महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; परभणीत पारा थेट ६ अंशांवर, अनेक जिल्ह्यांत गारठा वाढला

Winter Alert | महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; परभणीत पारा थेट ६ अंशांवर, अनेक जिल्ह्यांत गारठा वाढला

Winter Alert : महाराष्ट्रात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने नागरिकांना हाडं गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे वातावरण ढगाळ झाले असून सकाळी व रात्री गारवा, धुके आणि दव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही तापमानात चढ-उतार सुरू राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे.

काल परभणी येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये ७ ते ८ अंश, धुळ्यात ७.२ अंश तर पुणे, नाशिक, जेऊर, भंडारा आणि गोंदिया येथे १० अंशांपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरण असून गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामानशास्त्रानुसार किमान तापमान १० अंशांच्या खाली गेल्यास आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट मानली जाते. तापमानात ६.५ अंशांहून अधिक घट झाल्यास तीव्र थंडीची लाट समजली जाते. सध्या अनेक जिल्ह्यांत तापमान झपाट्याने घसरल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

परभणी ६, निफाड ८, पुणे ९.५, नाशिक १०, जळगाव ११, छत्रपती संभाजीनगर १०.६, बीड १०.५, गोंदिया १०, नागपूर १०.६, वाशीम १०.६, अमरावती ११.५, वर्धा ११.५, यवतमाळ ११, कोल्हापूर १४.८, सोलापूर १४, अकोला १४.५.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!