Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Double-Decker Flyover: विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! पुण्यातील पहिला डबल डेकर पूल ‘या’ दिवशी वाहतुकीसाठी खुला होणार

Double-Decker Flyover: विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार! पुण्यातील पहिला डबल डेकर पूल ‘या’ दिवशी वाहतुकीसाठी खुला होणार

Double-Decker Flyover: पुणे शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या विद्यापीठ (SPPU) चौकातील वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील पहिल्या ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या दोन महिन्यांत हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण या भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विलंबावर मात करत कामाला वेग

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑगस्ट 2025 मध्येच कार्यान्वित झाला होता. मात्र, बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना काही तांत्रिक कारणांमुळे त्याला विलंब झाला. आता हे काम युद्धपातळीवर सुरू असून, जानेवारी अखेरीस बाणेर आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत पाषाण पट्ट्यातील काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा – पुण्यात अजित पवारांकडून भाजपला मोठा धक्का! 25 वर्षांची निष्ठा सोडून ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीची वाट धरणार

कसा असेल हा अत्याधुनिक मार्ग?

हा प्रकल्प रस्ते वाहतूक आणि मेट्रो मार्गिका यांचा एक अनोखा संगम आहे. हा उड्डाणपूल मेट्रो आणि खासगी वाहने अशा दुहेरी वापरासाठी तयार करण्यात आला आहे. औंध आणि बाणेरहून येणारी वाहने तीन-लेनच्या मुख्य पुलावर विलीन होतील. शिवाजीनगरहून बाणेर-पाषाणकडे जाणारी वाहने तीन-लेन अप-रॅम्पचा वापर करून पुढे विभागली जातील. या संपूर्ण पुलाची लांबी साधारण 1.7 किमी आहे, ज्यापैकी औंध-शिवाजीनगर पट्टा 1.3 किमी लांब आहे.

कोंडीतून कायमची सुटका

सध्या विद्यापीठ चौकातून प्रवास करताना पीक अवरमध्ये सुमारे 45 मिनिटांचा वेळ वाया जातो. डांबरीकरण पूर्ण झालेल्या या पुलाचे उर्वरित काम पूर्ण होताच, हा ४५ मिनिटांचा प्रवास केवळ काही मिनिटांवर येणार आहे. केवळ रस्तेच नाही, तर मेट्रोच्या कामालाही यामुळे गती मिळणार असल्याने हा प्रकल्प पुण्याच्या दळणवळण व्यवस्थेसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!