Pune Politics : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत नाराजीचा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने निम्म्या विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना आणि आमदारांच्या नातेवाईकांना संधी दिल्याने ४२ विद्यमान नगरसेवक नाराज झाले आहेत. यातील अनेकांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन माघारीचा आज (३१ डिसेंबर) शेवटचा दिवस असताना या घडामोडींमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
तिकीट नाकारलेल्यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे. विशेषतः अमोल बालवडकर यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करत सनसनाटी घडवली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता, तो पाळला नाही. मी भाजपला आता धोबीपछाड देणार असा निर्धार केला आहे. भाजपने मला कार्यकर्त्यापासून नगरसेवक बनवले, आता उमेदवारी नाकारून राष्ट्रवादीचा पुण्यातील नेता बनवले. यात माझे नुकसान नाही, पक्षाचे नुकसान झाले. भविष्यात याचे उत्तर देईल.”
किरण बारटक्के यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत भावनिक साद घातली. “माझे काय चुकले?” असा प्रश्न विचारत त्यांनी लिहिले, “प्रामाणिक कार्यकर्त्यांनी राजकारणात येऊ नये, फक्त सामाजिक कार्य करावे.” ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
तिकीट कापलेले ४२ विद्यमान/माजी नगरसेवक
१. ऐश्वर्या जाधव
२. मारुती सांगळे
३. आयुब शेख
४. श्वेता गलांडे-खोसे
५. मुक्ता जगताप
६. सुनीता गलांडे
७. संदीप जराड
८. सोनाली लांडगे
९. राजश्री काळे
१०. आदित्य माळवे
११. सुनीता वाडेकर
१२. अर्चना मुसळे
१३. बंडू ढोरे
१४. स्वप्नाली सायकर
१५. ज्योती कळंबकर
१६. अमोल बालवडकर
१७. श्रद्धा प्रभुणे
१८. हर्षाली माथवड
१९. दीपक पोटे
२०. माधुरी सहस्त्रबुद्धे
२१. जयंत भावे
२२. स्वाती लोखंडे
२३. नीलिमा खाडे
२४. ज्योत्स्ना एकबोटे
२५. राजेश येनपुरे
२६. योगेश समेळ
२७. सुलोचना कोंढरे
२८. विजयालक्ष्मी हरियार
२९. आरती कोंढरे
३०. सम्राट थोरात
३१. मनीषा लडकत
३२. संजय घुले
३३. कविता वैरागे
३४. राजश्री शिळीमकर
३५. प्रवीण चोरबोले
३६. सरस्वती शेंडगे
३७. आनंद रिठे
३८. शंकर पवार
३९. वृषाली चौरे
४०. नीता दांगट
४१. राजश्री नवले
४२. दिशा माने
या बंडखोरीमुळे भाजपला काँग्रेस-ठाकरे सेना-मनसे युती आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. १५ जानेवारीला मतदान असून, अंतर्गत नाराजी निवडणुकीत भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे खळबळ उडाली आहे.


