Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात प्रचाराचा धुरळा..! राज्यातील दिग्गज नेत्यांची पुणे वारी, कोण-कोण सभा गाजवणार?

पुण्यात प्रचाराचा धुरळा..! राज्यातील दिग्गज नेत्यांची पुणे वारी, कोण-कोण सभा गाजवणार?

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील प्रमुख नेते पुण्यात दाखल होणार आहेत. विविध पक्षांचे दिग्गज नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रोड शो आणि विशेष कार्यक्रमांद्वारे मतदारांशी संवाद साधणार आहेत.

भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात सभा घेणार आहेत. सोमवारी येरवडा येथे त्यांची जाहीर सभा होणार असून ११ तारखेला फडणवीस यांचा अनोख्या पद्धतीचा “टॉक शो” आयोजित करण्यात आला आहे, जो मतदारांचे विशेष लक्ष वेधणार आहे.

शिंदेसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ तारखेला पुण्यात दोन सभा घेणार आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून सभासत्रांची सुरुवात करणार आहेत.

पुण्यातील ४१ प्रभागांमधील एकूण १६५ जागांसाठी मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठीही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना तसेच मनसेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हेही पुण्यात सभा घेणार आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत पुणे शहरात राजकीय प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!