पुणे : पुण्यात गुन्हेरागारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. गेल्या काही दिवासांपासून सतत खूनाच्या घटना पुणे शहरातून समोर येत आहेत. त्यातच ताजी घटना म्हणजे चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता दोघा युवकांना चाकूने वार करण्यात आले. हल्ला इतका गंभीर होता की त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसर्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
सोनु ऊर्फ लखन सकट वाघमारे (वय 18, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे मृत युवकाचे नाव आहे. काही कारणावरून वाद झाला. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले असून अधिक माहिती घेत आहेत.
सोनु ऊर्फ लखन सकट वाघमारे याच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून ही घटना झाली असावी असा अंदाज बाळगण्यात येत आहे. पोलीस तपासातून सत्य समोर येईल.


