Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: विना परवानगी विजयी मिरवणूक काढणे नवनिर्वाचित नगरसेवकाला पडले महागात; सूरज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime: विना परवानगी विजयी मिरवणूक काढणे नवनिर्वाचित नगरसेवकाला पडले महागात; सूरज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime: महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर परवानगी न घेता विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सूरज लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पर्वती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई काटकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ जानेवारी) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. विजयानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या समर्थकांनी जनता वसाहत परिसरातून मिरवणूक काढली.

दरम्यान, निकालानंतर शहरात कोणतीही मिरवणूक काढण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता तसेच आदेशांचे उल्लंघन करून मिरवणूक काढल्याचा आरोप लोखंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार आदक पुढील तपास करत आहेत.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणुकीनंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!