Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vidhan Parishad Election : क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, नंतर मुंबईत प्रशिक्षण

Vidhan Parishad Election : क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, नंतर मुंबईत प्रशिक्षण

Vidhan Parishad Election : नागपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी रणनीती आखली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाची मते फुटू नयेत आणि नगरसेवक एकसंघ राहावेत यासाठी भाजपकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेतील सर्व भाजप नगरसेवकांना प्रथम तीन दिवस गोव्यात नेण्यात येणार आहे. त्यानंतर ते मुंबईत परत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे 17 जून रोजी सर्व नगरसेवक नागपूरला परततील आणि 18 जून रोजी मतदान होणार आहे.

या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जून रोजी नगरसेवकांना नागपूरहून मुंबईकडे रवाना केले जाणार आहे. 11 जूनला ते गोव्याकडे जातील आणि 14 जूनपर्यंत तेथे मुक्काम करतील. त्यानंतर मुंबईत परत येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा आणि प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील.

यानंतर नगरसेवकांना पुन्हा नागपूरला आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांना स्थानिक राजकीय हालचालींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधान परिषद निवडणुकीत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असले तरी क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यामागे पक्ष संघटन, प्रशासनिक समन्वय आणि आगामी स्थानिक निवडणुकांसाठी मार्गदर्शन हा उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनामुळे राजकीय चर्चांना चांगलाच वेग आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!