Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati By Election: ‘राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर, सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल’, वडेट्टीवारांचं वक्तव्य

Baramati By Election: ‘राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर, सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल’, वडेट्टीवारांचं वक्तव्य

Baramati By Election: अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेने सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही.

‘बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचं बोलल्यानंतर वडेट्टीवार यांनी हे मोठे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल होणार आहे.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले

..तर बारामतीमध्ये तिहेरी लढत
एकीकडे विजय वडेट्टीवारांनी बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हं आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.

सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्यावं – लक्ष्मण हाके
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!