Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक जाहीर करण्याचा कोर्टाचा आदेश येताच दक्षिण पुण्यातील पाणीकपात स्थगित

निवडणूक जाहीर करण्याचा कोर्टाचा आदेश येताच दक्षिण पुण्यातील पाणीकपात स्थगित

पुणे : पाण्याची वाढती मागणी आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे पुणे महानगरपलिकेच्या वतीने मागील आठवडयात दक्षिण पुण्यासाठी एक दिवसाआडची पाणीकपात लागू करण्यात आली होती. फेरतपासणीनंतर मंगळवारी (दि.६ मे) ही पाणीकपात स्थगित करण्यात आली आहे. मात्र, महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करण्याचा निकाल कोर्टाने देताच पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या दक्षिण पुण्यातील अनेक भागात एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय २ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाचा एका आठवड्यानंतर फेरआढावा घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनास दिले होते. तसेच, वितरण व्यवस्था सुरळीत करून गरज नसल्यास हा निर्णय मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून या जलकेंद्रातून कात्रज परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने तक्रारी येत होत्या. त्यातच उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने त्यात भर पडली. त्यामुळे ज्या भागात कमी पाणी जाते, त्या भागाला पुरेसे पाणी देण्याचे कारण देत या जलकेंद्राचे सात दिवसांचे सात झोन करून प्रत्येक झोन आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार होती, याची अंमलबजावणी सोमवार (५ मे) पासून सुरू केली आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर अखेर मंगळवारी लगेच दुसऱ्या दिवशी हा निर्णय स्थागित करण्यात आला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!