Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुला कोणती पोस्टिंग हवी?, मॉलमध्ये सहकाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

तुला कोणती पोस्टिंग हवी?, मॉलमध्ये सहकाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या 21 वर्षीय महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तपास सुरू आहे. ही घटना 10 सप्टेंबरला घडली होती, तर 11 सप्टेंबरच्या रात्री पीडितेने तक्रार दाखल केली.

पीडित महिला आणि तिचा पती दोघेही खाजगी सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. ते दोघेही वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये ड्युटी बजावत होते. कंपनीतील वरिष्ठ पदावर असलेल्या मनोज धोंडीराम कदम (वय 45, चिखली येथील रहिवासी) याने ड्युटीदरम्यान पीडित महिलेला मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका बंद खोलीत नेले.

तेथे आरोपीने महिलेला “तुला कोणती पोस्टिंग हवी?” असा प्रश्न विचारला आणि नंतर तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील वर्तन करत शारीरिक जबरदस्ती केली. महिलेच्या विरोध आणि प्रतिकाराला बंधनकारक ठेवत आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी मनोज कदम याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. वाकड पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचने (DB) तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. मात्र, आरोपीला हृदयाचे आजार असल्याने त्याला नवीन थेरगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयीन उपचारानंतर त्याला दोन दिवसांसाठी न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!