Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी! आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांच्या ताब्यात

Ayush Komkar Murder: पुणे शहरातील गाजलेल्या आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. स्वत:हून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कृष्णा आंदेकर हा आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा मुलगा असून, संपूर्ण प्रकरणातील तो महत्त्वाचा आरोपी मानला जातो.

मागील 11 दिवसांपासून तो फरार होता. दरम्यान, त्याला कोणी आश्रय दिला होता का? आणि हत्याकांडातील त्याची भूमिका नेमकी काय होती? याचा सखोल तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू होणार आहे. आजच त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बंडू आंदेकरने न्यायालयात गंभीर आरोप केला होता. पोलिसांनी कृष्णाला ताब्यात द्या, नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी दिल्याचा दावा त्याने केला. त्याचबरोबर कोठडीत आरोपींना मारहाण होत असल्याचे, अंघोळ व कपडे बदलण्यास मज्जाव केल्याचेही त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. बुलढाणा आणि गुजरातमध्ये झालेल्या कारवाईत आंदेकर टोळीतील महत्त्वाचे सदस्य गजाआड झाले. यामध्ये बंडू आंदेकर व त्याचे नातेवाईक यांचाही समावेश आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार कृष्णा आंदेकर असल्याचे तपासात समोर आले होते. शेवटी, आज तोही पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!