Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोण आहेत आकाश मोरे? बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

कोण आहेत आकाश मोरे? बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता. परंतु या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं काँग्रेसकडून आधीच जाहीर करण्यात आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आकाश मोरे?

काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे विधानपरिषदेवर आमदार होते. आकाश मोरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसचे निष्ठावान समजले जातात. आकाश मोरे हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील चेहरा आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं निर्णयाक मतदान आहे, त्यामुळे काँग्रेसने यावेळी धनगर समाजाचे असलेल्या आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीच्या दौऱ्यावर असून, उद्याच आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!