Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: लग्नासाठी मुलगा शोधणाऱ्या शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक, 31 लाखांना लुटलं; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Pune News: लग्नासाठी मुलगा शोधणाऱ्या शादी डॉट कॉमवर महिलेची फसवणूक, 31 लाखांना लुटलं; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Pune News Today: लग्न जुळवणाऱ्या शादी डॉट कॉम या प्रसिद्ध संकेतस्थळावर ओळख वाढवून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 31 लाख 20 हजार 257 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना 23 डिसेंबर 2024 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चिंचवडमधील दळवीनगर,मातृछाया निवास येथे ऑनलाईन माध्यमातून घडली. पीडित महिलेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयेश पाटील ऊर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधला अन्..
आरोपीने मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून विविध वैयक्तिक कारणांसाठी पैशांची मागणी केली.फिर्यादीला एका बँकेतून प्री-अप्रूव्हड लोन आणि ओव्हर ड्राफ्ट सॅलरी लोन घेण्यास भाग पाडले. एका खासगी ॲपवरूनही ऑनलाईन कर्ज घेण्यास सांगून ती सर्व रक्कम स्वतःच्या पदरात पाडून घेतली.

अशाप्रकारे आरोपीने महिलेला कर्जाच्या खाईत लोटून तिची एकूण 31 लाख 20 हजार 257 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मॅट्रिमोनिअल साईट्सवर महिलेच्या फसवणुकीचा प्रकार घडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!