Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

डोक्याचा स्कार्फ महिलेचा ठरला कर्दनकाळ; मळणी मशीनमध्ये डोके अडकल्याने मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

डोक्याचा स्कार्फ महिलेचा ठरला कर्दनकाळ; मळणी मशीनमध्ये डोके अडकल्याने मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

भोर : डोक्याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रात ओढला जाऊन महिलेचे डोके यंत्रात अडकल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केंजळ (ता. भोर) येथे शनिवारी (दि. २६) घडली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सावित्रा पांडुरंग गायकवाड (वय २४) असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेचे पती पांडुरंग गायकवाड (वय ३८, सध्या रा. केंजळ, ता. भोर, मूळ रा. आंतरावली, ता. गणसांगवी, जि. जालना) यांनी राजगड पोलीसात खबर दिली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आपल्या कुटुंबीयांसोबत गेली ५ वर्ष केंजळ (ता. भोर) येथील मयूर चव्हाण यांच्या शेतातील कामे करून उपजीविका करत आहेत. शनिवारी सायंकाळी मयत महिला व त्यांचे पती यांनी शेतातील बाजरी भरडण्यासाठी नितीन बाठे यांचे मळणी यंत्र बोलावले. त्यांनतर काही वेळाने बाजरी भरडताना मशिनमध्ये पडलेली बाजरीचे कनसे उचलत असताना मयत महिलेच्या डोक्यावर बांधलेला स्कार्प व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकल्याने तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले.

या दुर्दैवी घटनेत अक्षरशः महिलेचे शीर धडावेगळे होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. राजगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या बाबतचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. मळणी करताना महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!