Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BRT Lane: पुणेकरांनो बीआरटी मार्गावरून वाहन चालवताय? फक्त दंड नाही तर आता लायसन्सही होणार रद्द

BRT Lane: पुणेकरांनो बीआरटी मार्गावरून वाहन चालवताय? फक्त दंड नाही तर आता लायसन्सही होणार रद्द

BRT Lane: पिंपरी-चिंचवड शहरातील बस रॅपिड ट्रान्झिट (BRT) मार्ग आता फक्त PMPL बससाठी राखीव करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर कार, दुचाकी, ऑटो यांसारख्या खासगी वाहनांची घुसखोरी वाढली आहे, ज्यामुळे बीआरटी बसच्या सुरक्षेवर परिणाम होत असून अपघाताची शक्यता वाढत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे थेट कारवाई

या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली, पण त्याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. आता प्रत्येक बीआरटी थांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे कोणतेही खासगी वाहन मार्गावर शिरले, तर त्याचे थेट व्हिडिओ पुरावे मिळतील. या पुराव्याच्या आधारे वाहतूक पोलिस आणि बीआरटी विभाग संयुक्तपणे कारवाई करतील, तसेच आवश्यक असल्यास वाहन चालकाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू होईल.

बीआरटी मार्गांची माहिती

पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 5 बीआरटी मार्ग आहेत, ज्यांची लांबी सुमारे 52 किलोमीटर असून 52 बीआरटी थांबे आहेत. या मार्गांमध्ये निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, चिखली ते जगताप डेअरी स्पाइन रोड, मॅगझीन चौक ते देहू-आळंदी फाटा यांचा समावेश आहे. या मार्गांवरून रोज हजारो प्रवासी बसने प्रवास करतात, मात्र खासगी वाहनांची घुसखोरीमुळे बसला विलंब होतो. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा – Pune Traffic: आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; AI आधारीत प्रकल्पामुळे सुटणार ट्राफिक जामची समस्या

दरम्यान, नगरपालिका आणि आरटीओ एकत्रितपणे ही कठोर मोहीम राबवत आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की बीआरटी मार्ग हे फक्त सार्वजनिक बससाठी आहे, त्यामुळे नियम मोडणाऱ्या खासगी वाहन चालकांवर थेट कारवाई होईल. शहरातील लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या या वाहतूक व्यवस्थेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!