Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातच्या कोठडीत 29 मार्चपर्यंत वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातच्या कोठडीत 29 मार्चपर्यंत वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case: नाशिक: स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ म्हणवून घेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातच्या पोलीस कोठडीत 29 मार्चपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तपासादरम्यान समोर आलेले धक्कादायक पुरावे आणि पीडित महिलांच्या वाढत्या तक्रारींमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून, पोलीस आता अघोरी कृत्यांच्या दिशेने तपास करत आहेत.

न्यायालयीन सुनावणीत सरकारी वकिलांचे खळबळजनक दावे
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात खरातच्या काळ्या कृत्यांचा पाढाच वाचला. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना ‘विशेष प्रकारचे पाणी’ आणि पेढा देऊन गुंगी आणत असे किंवा त्यांना संमोहित करून अत्याचार करत असे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या असून, त्याने नरबळी दिल्याचा दाट संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला आहे. या दाव्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वन्यजीव कायद्याचे उल्लंघन आणि मोठी जप्ती
भोंदूबाबा खरात लोकांना घाबरवण्यासाठी वाघ आणि सापांचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच, त्याच्याकडे बेकायदेशीरपणे हरणाची ‘कस्तुरी’ सापडल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गतही कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 6 लाख 53 हजारांची रोकड आणि लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे.

तक्रारदारांचा आकडा वाढला; ६ गुन्हे दाखल
सुरुवातीला एका पीडितेने धाडस दाखवून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर खरातला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र, आता पोलिसांच्या आवाहनानंतर अनेक महिला पुढे येत आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत त्याच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून, लग्नाआधी आणि नंतर महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अघोरी विधी आणि ‘सिद्धपूजे’चे रहस्य
ईशानेश्वर मंदिरातील ‘सिद्धपूजा’ नक्की काय होती आणि खरात कोणकोणते अघोरी विधी करायचा, याचा छडा लावणे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. या गुन्ह्यात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत आणि त्याने कोणाकोणाची फसवणूक केली आहे, हे शोधण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 29 मार्चपर्यंत कोठडी मंजूर केली असून, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!