Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांसाठी 1,339 कोटींचे मदत पॅकेज जाहीर! दिवाळीपूर्वी मिळणार मदत; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

शेतकऱ्यांसाठी 1,339 कोटींचे मदत पॅकेज जाहीर! दिवाळीपूर्वी मिळणार मदत; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

Eknath Shinde On Maharashtra Flood: महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. उच्चस्तरीय पथक सोलापूर आणि धाराशिवसह मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहे. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री सोलापूरला जातील, मी धाराशिवला भेट देईन आणि अजित दादा देखील दौऱ्यावर असतील. राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकार त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे. दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई दिली जाईल.’

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, मराठवाड्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (NDRF) थेट संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. सरकारची जबाबदारी आहे की, तातडीने मदत पोहोचवावी. यापूर्वीही महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि हे काम पुढेही सुरू राहील, असेही आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

1,339 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर –

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी 1,339 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून मदत वितरित केली जात आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!