Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘दाढीचे फोटो लावून मदतवाटप हा निर्लज्जपणा…’; मदतवाटपावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

‘दाढीचे फोटो लावून मदतवाटप हा निर्लज्जपणा…’; मदतवाटपावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

मुंबई: मराठवाड्यातील भीषण पुरस्थितीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. पूरग्रस्तांना मदतवाटप करताना काही नेत्यांनी भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. लोक मरत असताना काही जण मात्र आपले फोटो व दाढी दाखवत मदतवाटप करतात. अशा परिस्थितीत स्वतःचा प्रचार करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, अशी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

शेतीचे प्रचंड नुकसान

पूरामुळे मराठवाड्यात तब्बल 70 लाख एकरांवरील पिके वाहून गेली असून 36 लाख शेतकरी थेट संकटात सापडले आहेत. घरे, जनावरे, जमीन सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. ही केवळ एक हंगामी आपत्ती नाही. पुढील पिढ्यांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होणार आहे. शेतीच्या दृष्टीने मराठवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तिजोरीतून मदत द्या –

शिंदे गटावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, ‘जर त्यांच्याकडे इतका पैसा असेल तर सरकारच्या मदतीवर आपले फोटो लावण्याऐवजी समृद्धी आणि शक्तिपीठ महामार्गातील ठेकेदारांकडून घेतलेले पैसे तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत द्यावी.’ राज्यावर आधीच 9 ते 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा स्थितीत सरकारने फक्त 225 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावरून राऊत यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे 10 हजार कोटींच्या तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. सरकारकडे आपत्कालीन नियोजन नाही. दुष्काळ आणि अवकाळी पावसावेळी दिलेली आश्वासनेही पूर्ण झालेली नाहीत, कारण तिजोरीत पैसेच नाहीत, असंही राऊत यांनी यावेळी नमूद केलं.

विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा

राज्यात सध्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याची टीकाही राऊत यांनी केली. जनतेचा आवाज दाबण्यासाठी जाणीवपूर्वक ही पोकळी ठेवण्यात आली आहे. भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची नावे सुचवूनही त्यांची नियुक्ती होत नाही. हा निर्णय लोकशाही आणि महाराष्ट्राच्या जनतेविरोधात आहे, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!