Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर

Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर

Eknath Shinde Leades Join Karuna Munde Party: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका झालेल्या असल्या तरीही स्थानिक पातळीवरील नेते मंडळी आपल्या सोईनुसार पक्षप्रवेश करत आहेत. या निवडणुकांदरम्यान अनेक स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी सोईच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक जिंकलेली देखील आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

नेमका कोणी प्रवेश केला?
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील नाभिक सेनेचे खजिनदार अनिल शिंदे आणि मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब समुद्रे यांनी स्वराज्य शक्ती सेनामध्ये पक्ष प्रवेश केला. दोघांचा पक्षप्रवेश स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते झाला.

करुणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
या पक्षप्रवेशानंतर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की शिवसेना शिंदे गटात त्या दोघांनाही न्याय मिळत नव्हता. त्यांना त्यांच्या नेत्याला भेटता येत नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन ते आज आमच्या पक्षात सामील झाले आहेत.

करुणा मुंडे यांचा पक्ष कधीपासून सक्रिय आहे?
दरम्यान, करुणा मुंडे यांचा स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली होती. या पक्षाचे कार्यालय मुंबईतील सांताक्रुझ येथे आहे. या पक्षाचे एक कार्यालय बीड जिल्ह्यातही आहे. करुणा मुंडे यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी आणि बिड या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परळीतून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मात्र त्यांना मोजकीच मतं मिळाली होती. दरम्यान, आता धाराशीव जिल्ह्यातील दोन स्थानिक नेत्यांनी करुणा मुंडे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षाला विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!