Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहिल्यानगर मनपात ठिणगी! वादग्रस्त श्रीपाद छिंदमला सभागृहातून हुसकावून लावले; अर्थसंकल्पीय सभेत अभूतपूर्व राडा

अहिल्यानगर मनपात ठिणगी! वादग्रस्त श्रीपाद छिंदमला सभागृहातून हुसकावून लावले; अर्थसंकल्पीय सभेत अभूतपूर्व राडा

Ahilyanagar Municipal Corporation: महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करताच, इतर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. “महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला बोलू देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत नगरसेवकांनी छिंदमला अक्षरशः सभागृहाबाहेर काढले.

कागदपत्रे भिरकावली, माईक खेचला!
सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना छिंदमने प्रश्न मांडण्यासाठी उभं राहताच गोंधळाला सुरुवात झाली. संतप्त नगरसेवकांनी केवळ आक्षेपच घेतला नाही, तर छिंदमसमोर असलेले अर्थसंकल्पाचे कागद फाडून फेकून दिले आणि त्याचा माईकही बाजूला सारला. या अनपेक्षित प्रकारामुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते. तणाव वाढल्याने अखेर छिंदमला बाहेर जावे लागले.

‘माझ्या जीविताला धोका’; छिंदमचा गंभीर आरोप
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर श्रीपाद छिंदमने थेट अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आमदारांवर निशाणा साधला. “माझ्यावर सभागृहात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जर माझ्या जीविताला काही झाले, तर त्याला आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे नगरसेवक जबाबदार असतील,” असा खळबळजनक आरोप छिंदमने केला आहे.

नगरसेवकांचा ‘नो एन्ट्री’चा पवित्रा
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्या व्यक्तीने आराध्य दैवताचा अपमान केला, त्याला लोकशाहीच्या मंदिरात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे सांगत त्यांनी छिंदमच्या सहभागाला विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालावी, असा कायदा करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!