Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक; आरोपी तरुणाला अटक

अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक; आरोपी तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबादच्या पुंडलिकनगर परिसरात शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर एका युवकाने अचानक दगडफेक केली. दुपारी साधारणपणे 12 वाजताच्या सुमारास ही घटना त्यांच्या कार्यालयासमोर घडली. प्राथमिक माहितीनुसार, त्या वेळी मंत्री सावे आपल्या पुंडलिकनगर येथील कार्यालयात उपस्थित होते. त्यांच्या गाडीला कार्यालयाबाहेर पार्क करून ठेवले असताना एका तरुणाने अचानक दगड मारला. दगड गाडीच्या समोरील भागावर आदळला आणि त्यामुळे वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

घटनेनंतर मंत्र्यांच्या ड्रायव्हरने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ त्या तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात संबंधित युवक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही घटना तेव्हा घडली जेव्हा मंत्री सावे कार्यालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेवर अद्याप मंत्री अतुल सावे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, युवकाचा मानसिक आजाराचा इतिहास तपासला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!