Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरात खटल्यात उज्ज्वल निकम मैदानात; सरकारची बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची फौज सज्ज

Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरात खटल्यात उज्ज्वल निकम मैदानात; सरकारची बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची फौज सज्ज

Ashok Kharat case: अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या बहुचर्चित प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील अग्रगण्य कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची अधिकृतपणे एन्ट्री झाली आहे. राज्य सरकारने खरातविरुद्धची बाजू भक्कम करण्यासाठी त्यांच्या सोबतीला अहिल्यानगरचे प्रसिद्ध फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

विधी व न्याय विभागाकडून अधिसूचना जारी
गृह खात्याने या संवेदनशील खटल्याची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी (११ जून) या विशेष नियुक्तीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात अत्यंत प्रभावी आणि आक्रमकपणे मांडली जाणार असून, या हाय-प्रोफाईल खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.

‘निकम-फळे’ जोडीचा दांडगा अनुभव
अशोक खरातला कायदेशीर कोंडीत पकडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली ही जोडी फौजदारी खटल्यांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखली जाते. वकील परिमल फळे यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासोबत काम केले आहे. राहुरीचे आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण आणि नेवाशातील वकील रियाज पठाण खून खटल्यात या जोडीने सरकारची बाजू समर्थपणे सांभाळली होती. याशिवाय रेखा जरे हत्याकांड आणि संदीप वारळ हत्या प्रकरणासारख्या राज्या गाजलेल्या गुन्ह्यांच्या तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत फळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

आरोपी सध्या गजाआड; संपत्तीचीही होणार चौकशी?
भोंदूगिरीच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणारा संशयित अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून किती महिलांची फसवणूक केली, हे कृत्य तो कधीपासून करत होता आणि यादरम्यान त्याने किती बेकायदेशीर संपत्ती जमा केली, याचा सखोल तपास आगामी काळात समोर येण्याची शक्यता आहे. या तगड्या कायदेशीर नियुक्तीमुळे आता न्यायालयीन सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून होणारा युक्तिवाद आणि कोर्टातील घडामोडी अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!