Today सोमवार, 21st सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणुकीत पहिल्याच दिवशी अनपेक्षित वळण; स्थानिक शांत, पण बाहेरच्या उमेदवारांनी ठोकला शड्डू

Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणुकीत पहिल्याच दिवशी अनपेक्षित वळण; स्थानिक शांत, पण बाहेरच्या उमेदवारांनी ठोकला शड्डू

Baramati Bypoll: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बारामतीत एक आगळीवेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. स्थानिक पातळीवरून एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केला नसला, तरी चक्क मतदारसंघाबाहेरील ३ इच्छुकांनी आपली उमेदवारी नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निवडणूक कार्यक्रम आणि पार्श्वभूमी
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा जागांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर ४ मे २०२६ रोजी या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

कोणी दाखल केले अर्ज?
पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये बारामती बाहेरील खालील नावांचा समावेश आहे:

  • सतीश कृष्णा कदम: जत (सांगली) – हिंदुस्तान जनता पार्टी.
  • सागर शरद भिसे: सातारा – अपक्ष.
  • राघू घुटुकडे: सांगोला (सोलापूर) – न्यू राष्ट्रीय समाज पार्टी.

या ‘बाहेरच्या’ एण्ट्रीमुळे बारामतीच्या पारंपरिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय चुरस वाढणार: मुख्य लढत कोणामध्ये?
अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसने देखील ही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून जिल्हा कमिटीने तसा ठरावही मंजूर केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक उमेदवारांनी अद्याप वेट अँड वॉचची भूमिका घेतली असली, तरी प्रमुख पक्षांचे अधिकृत चेहरे समोर आल्यानंतर बारामतीचे रणमैदान पूर्णपणे तापणार आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रिंगणात नेमके किती आणि कोण उमेदवार उरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!