मोताळा (बुलढाणा): प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केल्याने एका २१ वर्षीय युवतीने तळणी येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १४ मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी २० मे रोजी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालखेड (ता. मोताळा) येथील बेबीताई राजू सोळंके यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली.
सोळंके यांची मुलगी लता राजू सोळंके (२१) हिचे नातेवाईक असलेले विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमिला हिरामण पवार यांनी त्यांचा मुलगा विश्वजीत याच्यासोबत फिर्यादीची मुलगी लताचें प्रेमसंबंध असल्याची समाजामध्ये खोटी बदनामी केली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी विजू सोळंके, हिरामण पवार व प्रमिला पवार (सर्व रा. परडा फाटा, ता. मोताळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


