Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : अमरावतीत अपघाताचा थरार; भरधाव कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : अमरावतीत अपघाताचा थरार; भरधाव कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : अमरावती येथील बेलोरा विमानतळ परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पुणे शहरातही एक दुर्दैवी अपघात घडला. कोंढवा परिसरात टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने १९ वर्षीय राष्ट्रीय फुटबॉलपटू आरिफ शेख याचा मृत्यू झाला.

महमदवाडी हद्दीतील क्लाऊड नाइन परिसरात सायंकाळी सुमारे ५ वाजता हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की आरिफ शेख दुचाकीवरून खाली पडला आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दोन्ही घटनांमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!