Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : ‘चमत्कार नव्हे हातचलाखी!’ लैंगिक शोषण केल्याची खरातची कबुली; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat : ‘चमत्कार नव्हे हातचलाखी!’ लैंगिक शोषण केल्याची खरातची कबुली; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat : नाशिक येथे भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो तथाकथित “चमत्कार” आणि “वशीकरण” यांचा आधार घेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सर्व गोष्टी प्रत्यक्षात हातचलाखी आणि फसवणुकीचे प्रकार असल्याचे त्याने चौकशीत मान्य केल्याचे समोर आले आहे. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए” असे म्हणत त्याने आपल्या कृत्यांची कबुली दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणात त्याला इतर कोणाची साथ होती का, याचाही तपास सुरू आहे. तसेच त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबतही मोठे खुलासे होत आहेत.

आज त्याची मुलगी तृप्तीबाला खरात हिची एसआयटीकडून चौकशी होणार आहे. तिच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीला अधिक वेग आला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!