Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बापरे! मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी, नागपूरमधील घटना

बापरे! मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी, नागपूरमधील घटना

नागपूर: नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. मनोरुग्णालयाच्या परिसरात मधमाश्यांनी हल्ला केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाश्यांच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रवेश करत रुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केलाय. मधमाश्यांच्या या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 39 रुग्ण जखमी झाले आहे. गुरुवारी दुपारी वॉर्ड क्रमांक चार आणि पाच जवळ रुग्ण जेवणाला बसले असताना मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केलाय.

मधमाशांच्या या हल्ल्यात 39 रुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर 60 वर्षीय रुग्ण किसन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान, मनोरुग्णालयाच्या 40 एकर परिसरात दाट झाडे आणि वृक्ष आहेत. रुग्णालयातीलच झाडावर हे मधमाशांचं पोळं होत.या दरम्यान घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाश्यांच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रवेश करत रुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केला. तर जखमींवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमणे यांनी दिलीय.

अकोला शहरातील न्यू तापडियानगर भागात आज पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केलाय. विलास बंकावार या पोलीस कर्मचार्याच्या घरात बिबट्या घुसल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केलाय. घरातील जिन्याच्या पायर्यांवर हा प्राणी बसलेला घरातील पाहुण्या महिला पुष्पा तुम्मे यांना दिसलाय़. त्यानंतर नागरिक बिबट्या म्हणत असलेल्या या प्राण्याने जिन्याच्या खिडकीची तावदानं फोडत बाहेर उडी मारलीय. या घटनेनंतर या भागात वनविभाग आणि पोलीस दाखल झालेत

प्राथमिक तपासणीनंतर वनविभागाने या प्राणी बिबट्या नसल्याचं म्हटलंय. बिबट्याच्या कोणत्याही खुणा आणि पगमार्क परिसरात आढळून आले नसल्याचे म्हटलेय. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन वनविभागाने केलंय. हा प्राणी मोठी रानमांजर किंवा तरस असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केलाय. मात्र, नागरिक हा प्राणी बिबट्याच असल्याच्या दाव्यावर ठाम आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!