Bihar Cabinet Expansion: मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन बिहार सरकारने गुरुवारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप केले. यावेळी भाजप, जेडीयू, लोजपा(रामविलास), HAM आणि RLM या सर्व घटक पक्षांना विविध महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली. तथापी पहिल्यांदाचं नितीश कुमार यांनी गृहमंत्रीपद सोडलं आहे. भाजपचे मंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देण्याच आली आहे. नवीन खातेवाटपात भाजप कोट्यातील मंत्र्यांना अनेक टॉप पोर्टफोलिओ मिळाले आहेत. यामध्ये प्रमुख विभागांचा समावेश:
- गृह विभाग – सम्राट चौधरी
- जमीन आणि महसूल – विजय कुमार सिन्हा
- आरोग्य व कायदा – मंगल पांडे
- उद्योग – दिलीप जयस्वाल
- शहरी विकास व गृहनिर्माण – नितीन नवीन
- कृषी – राम कृपाल यादव
याशिवाय कामगार संसाधन, पर्यटन, पशुसंवर्धन व मत्स्य, आपत्ती व्यवस्थापन, मागास व अतिमागास कल्याण, SC-ST कल्याण, IT, क्रीडा आणि सहकार यांसारखी विभागे देखील भाजपला देण्यात आली आहेत. तथापी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षाच्या जेडीयूच्या कॅबिनेट सदस्यांना जलसंपदा, ऊर्जा, ग्रामीण विकास, ग्रामीण बांधकाम, अन्न, ग्राहक व्यवहार, समाज कल्याण, शिक्षण आणि अल्पसंख्याक व्यवहार विभागांचे वाटप केले. याशिवाय वित्त व व्यावसायिक कर विभागही जेडीयूकडेच राहील अशी चर्चा आहे.
हेही वाचा – Bihar Election : बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
दरम्यान, पहिल्यांदाच सरकारमध्ये आलेल्या रामविलास पासवान यांच्या लोजपा पक्षाच्या मंत्र्यांमध्ये ऊस उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग विभागले गेले आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चाचे दीपक प्रकाश यांना पंचायती राज विभाग देण्यात आला आहे आणि एचएएम पक्षाचे संतोष कुमार सुमन यांना लघु जलसंपदा विभाग देण्यात आला आहे.


