भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू तसेच सांगलीची कन्या स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगली पार पडत आहे विवाह सोहळ्यासाठी सांगलीतील मानधना यांच्या फार्म हाऊस वर जोरदार तयारी सुरू आहे. आज सायंकाळी हळदी समारंभाला सुरूवात झाली आहे स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचे हळदीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यासाठी महिला क्रिकेट संघातील खेळाडू या सांगलीत दाखल झाले आहेत. स्मृतीचा होणारा पती पलाश याची देखील दमदार एन्ट्री आज झाली. ढोल ताशाच्या निनादात त्याचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. पलाशचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून ढोल-ताशांच्या संगतीने जंगी स्वागत करण्यात आलं. पलाश मूछल आणि त्याच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचं जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. >मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
आज स्मृती मंधानाने हळदी समारंभात धमाल केली आहे. हळदीच्या फोटोंमध्ये स्मृती अतिशय आनंदी आणि पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. स्मृतीचे हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पलाश मुच्छलने स्मृती मंधानाला कुठे केल होत प्रपोज
याच दरम्यान पलाशनेही एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, स्मृतीच्या डोळ्यांवर कपडा बांधून तिला डी वाय पाटील स्टेडियममध्ये नेण्यात येतं. त्यानंतर स्मृती डोळ्यांवरील पट्टी हटवते, तेव्हा पलाश घुडग्यावर बसून स्मृतीला प्रपोज करतो. त्यावेळी पलशच्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ असतो आणि एक डायमंड रिंगही असते. हे पाहून स्मृती भावनिक होते आणि तिच्या आनंदाला पारावरच उरत नाही.
स्मृती मंधानाच्या हळदी समारंभाचा जबरदस्त व्हिडीओ
View this post on Instagram
व्हिडीओच्या शेवटी पलाश स्मृतीच्या बोटामध्ये रिंग घालतो दोघेही आकर्षक रिंग कॅमेरासमोर दाखवतात. हा रोमॅन्टिक व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या सुंदर क्षणाला ड्रीम प्रपोजल म्हटलं आहे.
भारताला महिला वर्ल्डकप जिंकवून देण्यात स्मृती मंधानाचा सिंहाचा वाटा आहे. पलाशनेही स्मृतीच्या यशाबद्दल अनेक पोस्ट शेअर करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे स्मृतीच्या ‘SM18’या टॅटूचीही जोरदार चर्चा रंगली. लग्नाआधी समोर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी या कपलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


