Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दोंडाईचा नगरपरिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय! सर्व 26 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड

दोंडाईचा नगरपरिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय! सर्व 26 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड

Dondaicha Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे बिनविरोध वर्चस्व वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेने तर एक अनोखा इतिहास रचला असून, येथे एकाही जागेवर विरोधक मैदानात राहिलेले नाहीत. परिणामी नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजप उमेदवार निर्विवाद निवडून आले आहेत. ही स्थिती निर्माण होण्यासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वातील संघटनात्मक तयारी आणि स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.

पहिल्याच निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध

दोंडाईचा नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर यंदाची निवडणूक ही पहिलीच होती. मात्र नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली, ज्यामुळे स्पर्धाच संपुष्टात आली. नगराध्यक्षपदावरही भाजपचीच सरशी झाली असून, या पदासाठी नयनकुमार रावल, म्हणजेच मंत्री जयकुमार रावल यांची मातोश्री, बिनविरोध विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी नयनकुमार रावल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शरयू भावसार यांना उमेदवारी दिली होती. परंतु भावसार यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप नोंदवला. आक्षेप असा की, शरयू भावसार यांचे वडील अॅड. एकनाथ भावसार यांच्यावर घरपट्टीची थकबाकी आहे. हा दावा ग्राह्य धरत भावसार यांचा अर्ज बाद करण्यात आला. यानंतर भावसार कुटुंबियांनी धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

हेही वाचा – मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री बिनविरोध नगराध्यक्ष धुळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा अर्ज बाद

राज्यात तीन नगराध्यक्षांची बिनविरोध निवड

नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांपूर्वीच भाजपला बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या रूपाने मोठा फायदा मिळाला आहे. बिनविरोध निवडणून आलेल्या नगराध्यक्षांमध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे.

● सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत— माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील बिनविरोध
● धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषदेचे— मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल बिनविरोध
● जळगावच्या जामनेर नगरपालिकेत— भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!