Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! रीलच्या नादात रेल्वेची धडक, फुटबॉलसारखा उडाला तरुण; व्हायरल व्हिडिओने खळबळ

धक्कादायक! रीलच्या नादात रेल्वेची धडक, फुटबॉलसारखा उडाला तरुण; व्हायरल व्हिडिओने खळबळ

बुलडाणा : सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या भूताने आजकाल तरुणांना घेरून सोडले आहे. मात्र, या भूताचा शेवट धक्कादायक ठरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावजवळ रेल्वे ट्रॅकवर रील शूटिंग करताना धावत्या ट्रेनने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेनच्या धक्क्याने तो फुटबॉलसारखा हवेत उडाला, अशी भयावह दृश्ये असलेला लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृत तरुणाचा मित्रही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनदरम्यान घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार सायंकाळी सुमारे पाच वाजता शेगाव तालुक्यातील आळसना रेल्वे स्टेशनजवळ घडली. मृत तरुणाचे नाव शेख नदीम शेख रफिक (वय २२) असे असून, तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी होता. नदीम नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आळसना गावात आला होता.

लग्नाच्या आनंदात मग्न असताना, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या लालसेने त्याला रेल्वे ट्रॅकवर रील शूट करण्याचा मोह झाला. मित्रासह ट्रॅकवर उभा राहून तो रील बनवत होता. कानात हेडफोन्स लावलेले असल्याने ट्रेनची आवाजही कळला नाही. अशातच मुंबई-नागपूर एक्सप्रेसने वेगाने धडक दिली. धक्क्याने नदीम हवेत उडाला आणि ट्रेनच्या चाकाखाली सापडला. जागीच त्याचा मृत्यू झाला. नदीमच्या मृत्यूची बातमी कळताच पिंपळगाव राजा गावात शोककळा पसरली. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर धाव घेतली.

मित्र गंभीर जखमी

नदीमसोबत रील शूटिंग करत असलेला त्याचा मित्र हा देखील ट्रेनच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला. तो जवळपास उभा असल्याने ट्रेनने धडक दिली, ज्यामुळे त्याला अनेक ठिकाणी दुखापत झाल्या. स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि तो व्हेंटिलेटरवर आहे.

व्हिडिओ व्हायरल

घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रेन धडकताना नदीमचे शरीर हवेत उडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नदीम रीलसाठी पोज देत उभा आहे आणि मित्र कॅमेरा हातात धरून शूटिंग करत आहे. ट्रेन दिसताच मित्राने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला. धक्का बसतानाचा थरारक प्रसंग रेकॉर्ड झाला असून, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!