सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे १७७ कर्मचारी एकाचदिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने दोनशे ते तीनशे कर्मचारी विविध विभागासाठी नव्याने भरती करावे लागणार आहेत.
शासकीय नियमानुसार २१ मे रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदेचे १७७ सरकारी कर्मचारी शनिवार, ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त होणार आहेत. शासकीय सेवेत एक जून जन्म दिनांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ३१ मे रोजी निवृत्तीचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत, कृषी, अर्थ, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम व शिक्षण या विभागातील १७७अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. शिक्षण विभाग ९७, ग्राम पंचायत १८, आरोग्य विभाग १५, पशुसंवर्धन ४, बांधकाम क्रमांक एक १०, बांधकाम क्रमांक दोन ८, सामान्य प्रशासन विभाग ११, ग्रामीण पाणी पुरवठा २, कृषी २. आणि अर्थ विभाग १० अशा एकूण १७७ कर्मचाऱ्यांच्या निवृत्त झाले आहेत.


