Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी; १ जण गंभीर

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी; १ जण गंभीर

College Building Collapse : पंढरपूर तालुक्यातील माढा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या निर्माणाधीन इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने नऊ जण जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात होते. सुमारे ४५ फूट रुंद आणि १०० फूट लांबीचा स्लॅब दोन मशीनद्वारे टाकण्याचे काम सुरू असतानाच हा स्लॅब अचानक कोसळला. विशेष म्हणजे, स्लॅबवर काम करणारे काही कामगार काही वेळासाठी चहा पिण्यासाठी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

जखमींना तातडीची मदत

घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड धावपळ सुरू झाली. गणेश साळुंखे, भोलानाथ पाचंगे, शितल कानगे, नागनाथ मारकड आणि वैजिनाथ माळी यांनी प्रसंगावधान राखत जखमींना मलब्यातून बाहेर काढले आणि तातडीने डॉ. मस्के हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या संभाजी बागल यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रशासन घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार विजय कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, तलाठी पुरुषोत्तम जगदाळे आणि कोतवाल किशोर ढावरे यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व जखमींची विचारपूस केली.

या घटनेत संभाजी बागल‌ (रा. भोसरे) , परमेश्वर अर्जुन लोंढे (रा. चिंचोली वय ४५) दत्तु नारायण जाधव (महाळुंग वय ४०) , संतोष पांडुरंग मलगुंडे (भोसरे ४६), दत्तात्रय बळीराम रेडे ( भोसरे वय ३५), उमेश सतिश मदने (महाळुंग वय २६), विशाल निळू गायकवाड (जामगाववय २०), शंटू गोकूळचंद्र सरकार (कोलकत्ता वय ५०), कानन कालिचरण मंडोल (कोलकत्ता वय ३०) जखमी झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!