Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

कोल्हापूर: आजरा, चंदगड आणि भुदरगड या तीन तालुक्यांत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुशांत गुरव (वय ३५) याने कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणीतून आपल्या पत्नीचा खून केला आणि तो दरोडा असल्याचे भासवले; मात्र आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सुशांतचे पितळ उघडे पाडले. पत्नीच्या खूनप्रकरणी त्याला सोमवारी दुपारी अटक केली. दरोड्याचा बनाव करण्यासाठी घरातून चोरलेले दागिनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सुशांत हा अल्पशिक्षित; मात्र आपल्या वक्तृत्वाची छाप तो समोरच्यांवर पाडत होता. गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो वारकरी सांप्रदायात असल्याने गावोगावी कीर्तन सांगत होता. मवाळ भाषा, अंगाने धष्टपुष्ट असलेल्या सुशांतच्या बोलण्यामुळे अनेकजण त्याच्यावर विश्वास ठेवत होते. आजोबा व वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, आजाराने ग्रस्त असलेल्या आईचा तो सांभाळ करत होता.

पत्नी पूजाचीही त्याला चांगली साथ होती. सुदैवाने त्यांना दीड वर्षापूर्वी जुळी मुले झाली होती. सुशांत वारकरी सांप्रदायात असल्याने मुलांची नावे सोपान व मुक्ता अशी ठेवली होती. गुरव कुटुंबीय अगदी सुखात संसार करत होते; मात्र कीर्तन सांगणाऱ्या सुशांतने बाहेर अनेक आर्थिक व्यवहार केले होते. त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. पत्नीचे दागिने बँकेत ठेवून आपले फेडायचे, त्याने ठरवले कर्ज असे होते; मात्र सुशांतया उधळा स्वभाव, त्यातून अल्प कमाई यामुळे आपले दागिने सुशांतकडे देण्यास पूजा तयार नव्हती. त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

रविवारी रात्री उशिरापर्यंत सुशांत मोबाईलवर चॅटिंग करत होता. या दरम्यान पत्नीशी त्याचा वाद झाला. या वादानंतर सुशांतने पत्नीकडे दागिन्यांची मागणी केली, मात्र पूजा दागिने देण्यास तयार नसल्याने त्यांच्यातील वाद वाढला, रागाच्या भरात सुशांतने काठीचे फटके पूजाच्या डोक्यात मारल्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने यातच पूजाचा मृत्यू झाला.

कीर्तनात वेगवेगळे दाखले देणाऱ्या सुशांतने आपण या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी हा दरोडा होता, असे दाखवण्याचे ठरवले. त्यामुळे त्याने स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढून घेतले, पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने व ९० हजारांची रोकड एका पिशवीत भरून ती लपवून ठेवली. आपल्या घरात दरोडा पडला, असे ओरडत तो लहान मुलांना काखेत घेऊन रस्त्यावर आला. रात्री अडीच वाजता त्याने गल्लीतील लोकांना उठवले.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी संशयित सुशांत गुरवला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली, मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊन तपास भरकटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला प्रसाद दिल्यावर त्याने दरोड्याचा बनाव केल्याची कबुली दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!