Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक; पोलिसांनी तेलंगणामध्ये जात आवळल्या मुसक्या

मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक; पोलिसांनी तेलंगणामध्ये जात आवळल्या मुसक्या

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. याबाबत गृहविभागातील सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रशांत कोरटकरने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळला आहे.

कोल्हापूरमधील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत देखील आक्षेपार्ह विधान केले होते. तो नागपुरातून फरार होऊन चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिस गेले असता त्या ठिकाणाहून देखील तो फरार झाला होता.

एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला आपल्या ताब्यात घेणार आहेत. इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यानुसार प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे.

दरम्यान प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन उच्च न्यायालय देखील फेटाळणार असल्याची जाणीव झाल्यानंतर कोणताही पर्याय त्याच्यासमोर शिल्लक राहिला नाही. त्यामुळे कोरटकरला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!