Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jaykumar Gore : बँकच आमच्याकडे; मग तिजोरीची चावी कुठून आणणार? मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं

Jaykumar Gore : बँकच आमच्याकडे; मग तिजोरीची चावी कुठून आणणार? मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं

करमाळा : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात सोलापूरचे पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी थेट महायुतीतील मित्रपक्षांनाच लक्ष्य करत तुफान फटकेबाजी केली. “कोणी म्हणतंय तिजोरी आमच्याकडे, कोणी म्हणतंय चावी आमच्याकडे…पण बँकच आमच्याकडे आहे! मग तिजोरी-चावी कुठून आणणार?” असा बोचरा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणजेच सरकार

“मुख्यमंत्री म्हणजे सरकार असतं, मंत्रिमंडळ ही फक्त व्यवस्था असते. राज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनेच मंजूर होतो. हे कदाचित मित्रपक्षांनी विसरलंय,” असा उपरोधिक उल्लेख करत गोरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे गटालाच डिवचलं.

दोघे मिळून वाटून खाऊ, करमाळ्याची वाट लावू

सत्ताधारी मित्रपक्षांवर हल्ला चढवताना गोरे म्हणाले, हितं दोघांचं ठरलेलं असावं. कधी यांची सत्ता, कधी त्यांची सत्ता… नगराध्यक्ष हा ठेकेदार, ठेकेदार हा नगराध्यक्ष! दोघे मिळून वाटून खाऊ आणि करमाळ्याची वाट लावू असं चाललंय.

भाजपला सत्ता द्या म्हणून जनतेला आवाहन करताना गोरे यांनी ग्रामदैवत कमलाभवानी देवीची शपथ घेऊन सांगितलं, “करमाळा नगरपालिका भाजपकडे द्या, मी पालकमंत्री म्हणून ती दत्तक घेतो, असं जयकुमार गोरे म्हणाले.

सगळ्यांचे पैसे घ्या, पण…

कुर्डूवाडी येथील सभेत तर गोरे यांनी थेट पैशांच्या वाटपावरून बोट ठेवलं. २ डिसेंबरला मतदान आहे. कुणाचेही पैसे घ्या, काही हरकत नाही. सगळ्यांचे पैसे घ्या – हा पैसा त्यांच्या बापाचा नाही, तुमच्याच कामातून खाल्लेलं कमिशन आहे. १६६ कोटींच्या कामाचं कमिशन आहे. पण मत देताना देवा भाऊंनी दिलेली १५०० रुपयांची लाडकी बहिण योजना लक्षात ठेवा आणि स्वाभिमानाने भाजपला मत द्या, असंही गोरे म्हणाले.

जयकुमार गोरेंच्या या आक्रमक आणि मित्रपक्षांनाच टार्गेट करणाऱ्या भाषणामुळे करमाळा नगरपालिका निवडणुकीत खळबळ उडाली असून, महायुतीतील अंतर्गत कुरबुरी उघड झाल्याचं बोललं जातंय. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!