Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Crime News : रक्तरंजित थरार..! लातूर-सोलापूर महामार्गावर मित्राचा भोसकून खून, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, ओव्हरटेकने घेतले जीवघेणे वळण

Solapur Crime News : रक्तरंजित थरार..! लातूर-सोलापूर महामार्गावर मित्राचा भोसकून खून, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, ओव्हरटेकने घेतले जीवघेणे वळण

सोलापूर : मध्यरात्रीच्या काळोखात माणुसकीला लाजिरवाणी करणारी घटना घडली आहे. लातूरहून सोलापूरकडे परतत असताना ओव्हरटेकमुळे झालेल्या किरकोळ वादाने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला.

३७ वर्षीय अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा चाकूने आरपार भोसकून जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली ३२ वर्षीय सोनाली सुखदेव भोसले-सुपेकर (रा. अंत्रोळी, दक्षिण सोलापूर) ही गंभीर जखमी झाली. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यात चार वेळा चाकू भोसकला, तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केले. या घटनेमुळे महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी (१८ सप्टेंबर) रात्री १२:४५ च्या सुमारास लातूर-सोलापूर महामार्गावरील खाडगाव रोडवर ही खळबळजनक घटना घडली. अनमोल आणि सोनाली हे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील मेळाव्यात सहभागी झाले होते. सोनालीला संघटनेत पद देण्याबाबत चर्चा झाली, पण पदाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ते निराश झाले.

जेवण करून ते रात्री सोलापूरकडे निघाले. पाच नंबर चौकाजवळ जीप (एमएच-२६-व्ही-२३५६) गाडीने ओव्हरटेक करताना कारला कट लागला. चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे (२८ वर्षे, रा. खडकगल्ली, बाळे) याने शिवी दिली, तर अनमोलनेही दमबाजी केली. यामुळे वाद भडकला.

मध्यरात्री रक्तरंजित हल्ल्याचा थरार

काही अंतरावर जाऊन जीप रस्त्याच्या मधोमध आडवी लावली गेली. अनमोल आणि सोनाली कारमधून खाली उतरले, तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू झाली. झटापटी सुरू असताना जीपमधून उतरलेल्या एका हल्लेखोराने अनमोलच्या गळ्यात चाकूने आरपार भोसकला.

दोन वेळा समोरून गळ्यावर आणि दोन वेळा पोटात. रक्ताच्या थारोळ्यात तो जागीच कोसळला. सोनाली आणि दुसऱ्या हल्लेखोरात केस धरून मारामारी चालू असताना तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला. तीही गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडली. हल्लेखोर तात्काळ पसार झाले, तर चालक नवनाथने घटनास्थळीच पोलिसांना कळवले.

शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नवनाथ धाकपाडे यांनी फिर्याद दिली आहे. दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जिरगे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. अनमोलचा मृतदेह रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत घोषित झाला, तर सोनालीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!