Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrapur Accident: काळाचा क्रूर घाला! जावयाचा अंत्यविधी आटोपून परतताना सासऱ्याच्या गाडीला भीषण अपघात; कार नदीत कोसळली अन्…

Chandrapur Accident: काळाचा क्रूर घाला! जावयाचा अंत्यविधी आटोपून परतताना सासऱ्याच्या गाडीला भीषण अपघात; कार नदीत कोसळली अन्…

Chandrapur Accident: गडचिरोली जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोलपाकवार कुटुंबावर काळाने पुन्हा एकदा झडप घातली आहे. जावयाचा अंत्यसंस्कार आटोपून परतत असताना, आलापल्ली-आष्टी महामार्गावरील दिना नदीच्या पुलावरून कार थेट पात्रात कोसळली. या भीषण अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

एका दुःखातून सावरण्यापूर्वीच दुसरी दुर्घटना

नागेपली येथील व्यापारी सतीश कोलपाकवार हे आपल्या नातेवाईकांसह जावयाचा अंत्यविधी आटोपून आष्टीकडे परतत होते. आलापल्लीहून निघालेली त्यांची ‘हुंडई व्हेन्यू’ कार दिना नदीच्या पुलावर आली असता, अरुंद रस्ता आणि पुलाच्या रचनेचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा – Pune Cycling Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळून जखमी

दोघांचा करुण अंत, तिघे मृत्यूशी झुंज देतायत

या अपघातात यादव कोलपाकवार (रा. आष्टी) यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील कोलपाकवार (रा. आष्टी) यांना गंभीर अवस्थेत अहेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कारमधील इतर तिन जण गंभीर जखमी असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अरुंद पूल ठरतोय ‘डेथ ट्रॅप’
या अपघातानंतर दिना नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलाची अरुंद रचना आणि कमकुवत संरक्षक कठड्यांमुळे वाहनचालकांना अनेकदा अंदाज येत नाही. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत केली. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून कोलपाकवार कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!