Prevention Of Begging Bill: महाराष्ट्रात लवकरच भीक मागण्यावर बंदी लागू होणार आहे. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर आता विधानपरिषदेतही ‘भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक’ मंजूर झाले. मात्र, सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाच हे विधेयक मंजूर केले गेले, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विधेयकाची मांडणी राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी केली. परंतु सभागृहात शिवसेनेच्या मनीषा कायंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि तालिका सभापती नीलम गोर्हे यांसह अनेकांनी विरोध नोंदवला.
विधेयकाला विरोधकांकडून विरोध –
विरोधकांचे म्हणणे आहे की विधेयकाचे शीर्षक आणि त्यातील मजकूर यामध्ये ताळमेळ नाही. विधेयक मंजुरीनंतर विधान परिषद सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, जिथे विरोधक आणि पक्षनेते विधेयकाच्या अंमलबजावणीसंबंधी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा – Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी
दरम्यान, सर्व विरोधक असमाधानी असतानाही विधेयक मंजूर झाल्यामुळे आता विधेयकाची अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम कसे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


