Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

LPG सिलिंडरचा वापर थांबणार? छगन भुजबळांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची ‘ही’ रणनीती

LPG सिलिंडरचा वापर थांबणार? छगन भुजबळांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची ‘ही’ रणनीती

LPG Gas Cylinder Update: आखाती देशांमधील संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असतानाच, भारतात एलपीजी सिलिंडरऐवजी पाईपलाईन गॅस (PNG) जोडणीवर भर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी “येत्या तीन महिन्यात एलपीजी पुरवठा कदाचित बंद होऊ शकतो,” असे सूचक विधान केल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडत पीएनजी प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.

छगन भुजबळांचे विधान
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत छगन भुजबळ सहभागी झाले होते. या बैठकीनंतर त्यांनी संकेत दिले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार भविष्यात एलपीजीचा भार कमी करून नागरिकांना पीएनजीकडे वळवण्याचे उद्दिष्ट आहे. “पुढील तीन महिन्यांत एलपीजीची उपलब्धता मर्यादित होऊ शकते, त्यामुळे पीएनजी जोडणी वाढवणे ही काळाची गरज आहे,” असे विधान त्यांनी केल्याने खळबळ उडाली.

मुख्यमंत्री फडणवीसांचा दुजोरा: गॅस पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर
भुजबळांच्या विधानावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएनजी हेच भविष्य असल्याचे मान्य केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गॅस पाईपलाईन टाकण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने कालच एक नवीन जीआर (GR) काढून अटी शिथिल केल्या आहेत. शहरांमध्ये ‘महानगर गॅस निगम’मार्फत पाईपलाईनचे जाळे विस्तारले जात आहे. यामुळे सिलिंडरची गरज भासणार नाही आणि भविष्यातील इंधन संकटाचा सामना करणे सोपे होईल. आपल्याकडे पीएनजीचा साठा पुरेसा आहे, फक्त तो घराघरांत पोहोचवण्याची प्रक्रिया वेगवान करणे आवश्यक आहे.

काय आहे पीएनजी (PNG) आणि त्याचे फायदे?
एलपीजी (सिलिंडर) च्या तुलनेत पीएनजी (पाईप गॅस) अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने, केंद्र सरकार आता शहरांना प्राधान्याने ‘गॅस ग्रीड’शी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!