Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IPL 2026: चिन्नास्वामीवर आज रंगणार IPL चा पहिला सामना, कोणते संघ खेळणार? किती वाजता सुरु होणार सामना?

IPL 2026: चिन्नास्वामीवर आज रंगणार IPL चा पहिला सामना, कोणते संघ खेळणार? किती वाजता सुरु होणार सामना?

RCB vs SRH: इंडियन प्रिमियर लीगला आजपासून सुरु होणार आहे. 19 व्या सिझनमध्ये पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर त्यांच्या घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना जिंकून विजयी श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न करणार आहे.

तर दुसरीकडे सनरायझर्सने आतापर्यंत केवळ २०१६ मध्ये एकदाच आयपीएलच्या ट्रॉफीला गवसणी घातली होती. सध्या पॅट कमिंस दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून टीममधून बाहेर आहे. त्यामुळे कर्णधार पदाची धुरा इशान किशनकडे सोपवण्यात आलीये. दरम्यान आजच्या सामन्याची प्लेईंग ११ आणि पीच कसं असणार आहे याची माहिती घेऊया.

बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या सिझनचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याचा टॉस संध्याकाळी सात वाजता होणार असून साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

कसं आहे एम चिन्नास्वामीचं मैदान?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या होम ग्राऊंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत १०० आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने आतापर्यंत ४३ वेळा तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीमने ५३ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक स्कोर करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ रन्स केले होते.

RCB प्लेइंग 11

विराट कोहली , फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, जेकब डफी, मंगेश यादव, भुवनेश्वर कुमार.

SRH प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!