Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Medical Negligence in Pandharpur: पंढरपुरात खळबळ! दुखणं उजव्या हाताचं, पण डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Medical Negligence in Pandharpur: पंढरपुरात खळबळ! दुखणं उजव्या हाताचं, पण डॉक्टरांनी कापलं डाव्या हाताचं बोट; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Medical Negligence in Pandharpur: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकल्याच्या उजव्या हाताच्या वाढीव बोटाची शस्त्रक्रिया करायची असताना, महिला डॉक्टरने चक्क त्याच्या डाव्या हाताचे चांगले बोट कापून काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ‘महाप्रतापामुळे’ पीडित बालक आयुष्यभरासाठी बाधित झाले असून, संतप्त पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे.

नेमका गोंधळ काय झाला?
शाहू सुनील दंदाडे या सहा वर्षीय बालकाला दोन्ही हातांना जन्मजात सहा बोटे होती. त्यापैकी त्याच्या उजव्या हाताचे वाढीव बोट दुखत असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचे ठरले होते. शस्त्रक्रियेवेळी चिमुकला शाहू स्वतः डॉक्टरांना वारंवार ‘कोणते बोट काढायचे’ हे सांगत होता. मात्र, त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून संबंधित महिला डॉक्टरने उजव्याऐवजी डाव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया केली.

पालकांचा संताप आणि प्रशासनाची भूमिका
शस्त्रक्रियेनंतर जेव्हा पालकांना चुकीच्या हाताचे बोट काढल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. सरकारी रुग्णालयातील या गलथान कारभारामुळे चिमुकल्याचे नाहक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक विशेष तपास समिती गठीत केली आहे.

दरम्यान, आधीच बेडची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळणे यामुळे चर्चेत असलेल्या सरकारी रुग्णालयांची प्रतिमा या घटनेमुळे अधिकच मलीन झाली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!