Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raigad: इर्शाळगडावर ट्रेकींगला गेलेल्या तरुणाचा अपघात; तोल जाऊन दरीत कोसळला, जागीच मृत्यू

Raigad: इर्शाळगडावर ट्रेकींगला गेलेल्या तरुणाचा अपघात; तोल जाऊन दरीत कोसळला, जागीच मृत्यू

Raigad: सुट्ट्या लागल्यानंतर कुठेतरी धाडसी (trekking) जाण्यासाठी सध्याची तरुणाई उत्सुक असते, अनेकदा ट्रेकींगची आवड जोपासत वेगवेगळ्या गडांवर, दरी, डोंगररांगात जाऊन भटकंती करण्याचाही छंद तरुणाई जपत आहे. मात्र, याच छंदातून काहीवेळा गंभीर अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा उंच डोंगरमाथ्यावरुन, दरीतून तोल जाऊन नाहक जीव गमवावा लागतो किंवा कधी कधी कायमचं अपंगत्व देखील येतं. रायगड (Raigad) जिल्ह्याच्या इर्शाळ गडावर अशीच दुर्घटना घडली असून 26 वर्षीय तरुणाचा गडाच्या पायथ्याला मृतदेह आढळून आला.

रायगडच्या इर्शाळ गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील ही दुर्घटना असून भिवंडी येथील आकाश वाघमोडे (वय 26) हा तरुण काल रविवारी इर्शाळगडावर सोलो ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, एकटाच ट्रेकींगसाठी आला असता तो दरीत कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली.

आकाशची मोटर सायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी सापडली, तर त्याचा संपर्क होत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता. खालापुर पोलिस आणि खोपोली येथील हेल्प फाऊंडेशन यांनी सोमवारी शोधकार्य सुरु केले असता आकाशचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. इर्शाळगडाच्या दरीत पायथ्याशी आकाशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, पोलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

दरम्यान, ट्रेकींगसाठी उंच गडावर किंवा डोंगरदऱ्यांमध्ये जाताना तरुणांनी काळजी घ्यावी, शक्यतो सोलो ट्रेकींगऐवजी ग्रुप ट्रेकींग करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!