Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक; अदिती तटकरेंकडून सावधगिरीचा इशारा

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक; अदिती तटकरेंकडून सावधगिरीचा इशारा

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने राज्यातील काही भागांत महिलांची फसवणूक आणि त्यांच्याशी गैरवर्तन होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना कोणत्याही आमिषाला किंवा मध्यस्थांच्या जाळ्यात न अडकण्याचे जाहीर आवाहन केले आहे. विशेषतः जळगाव येथील संतापजनक घटनेची दखल घेत, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.

ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत; मध्यस्थांची गरज नाही
मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती देताना स्पष्ट केले की, ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नाही. महिला आपल्या मोबाईलवरून स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर प्रक्रियेत काही अडचण आली, तर स्थानिक अंगणवाडी सेविकांची मदत घेता येईल. ई-केवायसीमधील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे, मात्र नवीन नोंदणी प्रक्रिया सध्या बंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

जळगाव प्रकरणाचा अहवाल प्राप्त; दोषींवर कठोर कारवाईचे संकेत
जळगावमध्ये ई-केवायसीच्या नावाखाली एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची तातडीने दखल घेत तटकरे यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. “महिलांच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असे तटकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी: अवघ्या 8 तासांत मिळणार मंजुरी
दुसरीकडे, राज्यातील गरजू रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सुटसुटीत करण्यासाठी नवी अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. या नव्या यंत्रणेमुळे अर्जाची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया केवळ 8 तासांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच या प्रणालीचे लोकार्पण होणार असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.

प्रशासनाचा इशारा
महिलांनी आपले वैयक्तिक दस्तऐवज किंवा ओटीपी (OTP) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!