Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Taliban Pakistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव; तालिबानच्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, अनेक चौक्या ताब्यात

Taliban Pakistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव; तालिबानच्या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, अनेक चौक्या ताब्यात

Taliban Pakistan War : काबूलमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तान सैन्याने ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर जोरदार हल्ला केला. हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहार प्रांतांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत 12 पाकिस्तानी सैनिक ठार, तर दोन जखमी झाले. अफगाण सैन्याने कुनार आणि हेलमंड येथील प्रत्येकी एक चौकीसह अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी सुविधांचे मोठे नुकसान झाले.

11 ऑक्टोबरच्या रात्री 9:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) अफगाण सैन्याने कुर्रम सीमेवर पाकिस्तानी फ्रंटियर कॉर्प्सच्या चौक्यांवर शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे वारंवार उल्लंघन केल्याने इस्लामिक अमिरातच्या सैन्याने हे प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले.

9 ऑक्टोबरला पाकिस्तानने काबूल आणि पक्तिका प्रांतांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे एक नागरी बाजारपेठ आणि 35 निवासी घरे उद्ध्वस्त झाली होती. यानंतर तालिबानने चेतावणी देताना हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले होते. सध्या ड्युरंड रेषेवरील तणाव वाढत असून, सीमेवरील परिस्थिती गंभीर बनली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!